शेती अवजारे अनुदानावर खरेदीसाठी अर्ज सुरू - 85% अनुदानावर शेती अवजारे लगेच करा अर्ज, या जिल्ह्यात अर्ज सुरू - Sheti Avjare Kharedi Yojana - Maharashtra government scheme for farmers
शेतकरी बांधवांसाठी केंद्र तसेच महाराष्ट्र राज्य सरकार वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना राबवित असते. आणि शेतकरी या योजनाचा फायदा घेऊन आपआपली प्रगती साधत असतात. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी अनेक अत्याधुनिक व नवनवीन शेती अवजारे हवी असतात पण आपला शेतकरी हा अतिशय गरीब असल्यामुळे तो हे अवजारे घेऊ शकत नाही. हि अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने १ योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदी करण्यासाठी ८५% अनुदान मिळणार आहे.या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी शेती उपयोगी असणारी अवजारे विकत घेतील परिणामी शेतीवर होणारा खर्च कमी होईल व आतून शेतकरी आपली आर्थिक प्रगती करतील.
या अनुषंगाने राज्यामध्ये शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदीसाठी विविध प्रकारच्या Sheti Avjare Kharedi Anudan Yojana योजना अंतर्गत लाभ देण्यात येत आहे.
सध्या हि योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या ठिकाणी राबवली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा