महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत | महाराष्ट्र राज्यात कुठेही प्रवास करा अर्ध्या तिकिटात | ST Bus Maharashtra | Maharashtra ST Bus Women Concession
नमस्कार मित्रांनो, अतिशय गोड बातमी आहे आता महिलांना एसटीच्या तिकीटात 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यानुसार त्या महाराष्ट्र राज्यात कुठेही प्रवास करू शकतात आणि ते पण फक्त अर्ध्या तिकिटात. सन 2023-2024 साठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प राज्यसभेत मांडला. या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट म्हणजे महिलांसाठी असणारी ५०% सवलत. ही सवलत दि.१७ मार्च २०२३ पासुन लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
महिलांना एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत केव्हापासून मिळणार ? | Mahila ST Bus Savalat | From when women will get a 50 percent discount on ST travel rates ?
महिलांना 17 मार्च 2023 पासून राज्यातील सर्व एसटी Bus प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मध्ये महिलांकरिता 50 टक्के प्रवास भाड्यात सूट मिळणार आहे. ह्या सवलतीचा फायदा घेण्यासाठी कसलीही अट नाही .
या महिलांना मिळेल लाभ | These women will be in receipt of benefits.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून दररोज सुमारे 50 लाख प्रवासी प्रवास करत असतात. यातील ३०% ह्या महिला असतात म्हणजेच सुमारे १५ लाख प्रवासी या महिला असतात. यामुळे राज्यातील १५लाख महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. शालेय मुली आणि नोकरदार महिला यांसाठी हि योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
MSRTC कडून असणाऱ्या सवलती | Concessions from MSRTC for senior citizen
सध्या महाराष्ट्र सरकार व ST महामंडळा कडून राज्यातील जेष्ठ नागरिकांनासाठी १ योजना राबवली जात आहे . यानुसार ७५ वय असणारे नागरिक MSRTC च्या कोणत्याही BUS मधून फ्री प्रवास करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय हे ७५ किंवा त्यापेक्षा जास्त आसले पाहिजे. आणि तुमच्याकडे आधारकार्ड आसले पाहिजे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा